व. पु


जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं......
कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही

व. पु

आपण सारे अर्जुन


No artist can creat a character greater than himself.

महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तिपेक्षा व्यास श्रेष्ठ होते. म्हणुनच महाभारताची निर्मीती झाली.
एकच व्यास. उरलेल्यांना लिहीण्याचा हव्यास.

अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो. आणी आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो.

काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात.

पूर्णत्व म्हणजे तरी काय? ते व्यक्तिसापेक्ष आहे का? तसं असेल तर, प्रत्येक जीव , मर्यादांनी बद्ध. मर्यादांची, अद्न्यानाची जेवढी जास्त विपुलता, विशालता, तेवढ्या प्रमाणात एखाद्याला कोणतीही मामुली गोष्ट परिपूर्ण वाटेल. वास्तवाशी इमान राखणं अत्यंत आवश्यक. वास्तव म्हणजे काय नेमकं?
स्वत:ची पात्रता.

समाजात आपण आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाजाच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याचं सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकानं आत डोकावून पाहावं. जाहीरपणे मान्य करण्याच सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वत:ची स्वत:ला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वत:पासून पळू शकत नाही.स्वत:च्या सावलीवर जो भाळला, तो फसला.

एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'

व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.

( आपण सारे अर्जुन - व. पु. काळे )

व. पु

महोत्सव


आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो.

निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर करणं हा सहजधर्म होईल.

एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे.

एका माणसाच्या समस्येवर दुसर्‍या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोचू शकत नाही. तो स्व:तच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणार्‍या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.

सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा, अंतर्मनातल्या वीणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द. ’जास्त’. दँट्स आँल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्टा, जास्त मोठं घर, जास्त वरचं पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त!

व्यवसायासाठी पार्टनरशिप करता येते. पण घर गाठल्यावर कोणत्याही व्यक्तीला प्रथम घरंच हवं असतं. भूक, शरीरधर्म सगळं रुटीन असतं. पण जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की - गंमत म्हणून शब्द वापरतो - रुटीनचं प्रोटीन होतं.

बुध्द सांगतो, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रावासात जर एखादा मोठा दगड वाटे आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.

यू नेव्हर मीट द सेम मँन अगेन.

जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही.

सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फ़क्त तू तुझ्यापुरतं आठवं.

व. पु

रंग मनाचे

' नावात काय आहे?' - हा प्रश्न तसा जगजाहीर.नावात खरचं तसं काही नाही.ते नाव घेवुन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्व. तुम्हांला कोणते आईवडील लाभले त्यावर बरचसं अवलंबुन.तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.
पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजुतल्या एका ताटलीतल्या.दुसरी ताटली तुमची स्व:तची.ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबुन.

'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.

कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारकं संपली.
राहतात त्या तसबिरी.

दुर्गुणांना अनेक रुपं धारण करता येतात.आणी इतकी ती आकर्षक असतात.

माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी कसे समजणार?ज्याचा तोही सांगु शक्त नाही, मग इतरांनी शिक्के मारायची घाई का करावी?

व. पु

प्लेझर बाँक्स १

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

It is better to have loved and lost than never to have loved at all !

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

जोपर्यंत स्व:तच्या विचारांचा शोध स्वतलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं सगळ्यांचं.

जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.

Love decides what is wrong, instead of who is wrong.

माणुस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ़्टी व्हाल्व्ह शब्द आणी संवाद हा आहे.

पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.
जो शब्द नाकारतो तो विचारच नाकारतो.
मैत्री म्हटलं की काय असावं काय नसावं ह्याचं चिंतन करावं.

प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठीकाणीच जाऊ शकतं.

कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.
जो माणुस जीवनाला कंटाळलाय, वैतागलाय त्यला एवढचं विचारावसं वाटतं "राजा, तू कधि लताचं गाणं ऐकलयंस? ' रसिक बलमा ' किंवा ' ओ बसंती ' डोळे मिटुन तंद्रित ऐकलयसं. आणी जर नसलसं तर ऐक.पुन्हा पुन्हा ऐकत रहा. तुला जगावसं वाटेल.आणी असं वाटत असतानाच तु वपुंच्या कथा ऐक. तुला कधिच मरावसं वाटणार नाही.

व. पु

ही वाट एकटीची


मोहाच्या क्षणी बुद्धीवर भावना मात करते.

प्रामाणीकपणा शिकवायचा नसतो तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.

अपेक्षीत गोष्टीपेक्षा अनपेक्षीत गोष्ट जास्त आनंद देते.

जेव्हा नजरच हरवते तेव्हा समोरच्या दृष्याला काही अर्थ राहतो का?

प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो.

कैफ़ाच्या क्षणी दोनच गोष्टी खर्‍या.तो क्षण आणी तो कैफ़.

हे आयुष्य रित सांभाळण्यासाठी जगायचं की कैफ़ लुटण्यासाठी?

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

अंगात धडाडी असणारी माणसचं वाव मिळेल तिथं उडी घेतात.

दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते.

रसिकतेचं नातं देहाशी नसतं. ते टवटवीत मनाशी असतं.

माणुस हा एकच असा विषारी प्राणी आहे की ज्याच्या विषाचं मर्मस्थान सापडलेलं नाही