खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते,
तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.
असे असेल,तसे झाले असेल,असे काल्पनिक विचार करीत आपण
मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.
मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज,अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.
चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.पण मैत्रीमधील धागे तुटायला,एका क्षणाचाही वेळ लागत नाही.
तेव्हा मित्रांनो,
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा
आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राचीक्षमा मागायला लाजू नका............. !!!!!
👍👌
ReplyDelete