कळत नकळत



कळत नकळत गोष्टी बदलतात,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही न काही शिकवून जातात,
नेहमीच हव तसं होत नसत,
कारण जे मनात असत ते नशिबात असतच असं नसत.....


कधी कधी स्वत: ला प्रश्न पडतो - कि हे अस का होतं ?
सगळकाही सुरळीत करण्याच्या प्रयत्नांतच - जे आहे ते हि बिघडतं,
नक्की काय हवंय अन काय नाकोच्या जाळ्यात - आयुष्याची वाट च चुकते,
मनाच ऐकायचं कि बुद्धीचं, अशी दुविधा स्थिती होते.....


आयुष्य कुणी दुसर लिहित नसत, ते आपल्याच हाती असत,
येताना काही आणायचं नसत - जाताना काही न्यायचं नसत,
मग हे आयुष्य तरी कशासाठी असत ?
तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच, हे आयुष्य जगायचं असत.....

No comments:

Post a Comment