जेव्हा आपण मोठे होत असतो, तेव्हा स्वप्न बघायला, रंगवायला लागतो.... एक वेगळ विश्व तयार करत असतो......नवं-नवीन गोष्टी शिकत असतो.....अनुभवत असतो......
मी हि तेच केलंय....माझ्या विश्वात खूप थोडी लोक होती आणि आहेत.....मी खूप सरळ मानाने विचार करते......मला वाकड्यात शिरायला नाही आवडत... पण जशी जशी मोठी होत गेले अन महत्वाचं म्हणजे जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा जग कस आहे ते कळायला लागलं.....ज्या सोप्प्या पद्धतीने मी विचार करते तसं जग नाहीये.......हे लक्षात आलं.....
जसा जसा खोलवर विचार करायला लागले तसं तसं कळायला लागल कि माणूस नेहमीच एकटा असतो....कुठेही जाताना....काहीही करताना....काहीही असो......तो नेहमीच एकटा असतो कारण त्याच्या मनातले विचार फक्त त्यालाच माहिती असतात.......बाकी कुणालाच माहिती नसतात.......मोठं होत असताना, प्रत्येक जन घडत जात......
आप आपल्या पद्धतीने.... विचाराने...अनुभवा ने.....
खूप काही करावस प्रत्येकाला च वाटत.....कारण प्रत्येकाचं च एक वेगळ विश्व असत....आपण तसं करत हि असतो.....कारण आपण च रंगवलेल जग आपल्याला अस्तित्वात आणायचं असत......हे सगळ करत असताना......एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते......ती म्हणजे आपला जोडीदार....... आई वडील भाऊ बहिण मित्र मैत्रिणी असतातच...... पण जोडीदार असण्याची गोष्ट च निराळी असते ... आणि पुन्हा या जोडीदार बद्दल प्रत्येकाने रंगवलेलं एक विश्व असत.....स्वप्न असतात......अपेक्षा असतात.....
आत्ता प्रश्न असतो २ लोकांचा.......ज्याच त्याच विश्व आणि स्वप्न....... प्रत्येकाला च साजेसा,मनात रंगवलेला जोडीदार नाही मिळत........ मग इथे अस्तित्वात येते ती एकमेकांबद्दल ची आपुलकी, जिव्हाळा, विश्वास आणि मैत्री..... या ४ गोष्टी जेव्हा त्या २ लोकां मध्ये बांधल्या जातात तेव्हा सगळ काही सुरळीत चालत....... अर्थातच सगळ हव तसच होत नसत....... पण जे काही होत असत ते समजूतदार पणे (mutual understanding) चालवाव लागत........
कारण आयुष्य असंच जागाव लागत..... जेव्हा त्या २ जणांत निस्वार्थी पणे एकमेकांसाठी जगण्याची भावना निर्माण होते, तेव्हा त्यांची बनवलेली विश्व रंगतात आणि ती अस्तित्वात येण्यासाठी ते २ घ हि एकमेकांना साथ देतात.... हि साथ असते आपुलकीची आणि त्यांच्यातल्या विश्वासाची....
भरपूर वेळा मन माराव लागत.. पण त्या हि मागे काहीतरी चांगल होणार असत म्हणूनच ते तसं असत ना..... नसतील तुमच्या २ घा त गोष्टी जुळत पण त्या समजूतदार पणे जुळूवुन घेण्यातच एक वेगळा आनंद असतो....... आणि त्यातूनच रंगलेलं आयुष्य अस्तित्वात येणार असत..... फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे जर कधी मना सारख होत नसेन तर मनाला समजावण्याची..... त्याला आधार देण्याची..... आणि जमल तर त्याला नियंत्रणात ठेवण्याची..... प्रत्येक वेळी नाही पण मात्र काही वेळा नक्कीच......
आयुष्याच खर गमक ज्याला उमगत त्याला आयुष्य भरभरून जगण अगदी सहज पणे जमत.....अन हे गमक उमजण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते....गरज असते ती फक्त विश्वासाची...स्वत: वरच्या आणि जोडीदारावरच्या ......!!!!
एकदा खऱ्या अर्थाने विश्वास ठेऊन बघा.....सगळंच सोप्प होईल.......
म्हणतात ना कि --
चालणारे दोन पाय किती विसंगत....
एक मागे असते, एक पुढे असते ,
पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असत, क्षनात हे बदलणार असत,
याचच नाव जीवन असत....!!!!
No comments:
Post a Comment