मनुष्य जन्म असल्याचा अभिशाप ???




आयुष्य छोट्या छोट्या गोष्टितही खुप काहि शिकवून जाते ..
कळत नकळत अस होत असत की मनाला त्याची कधी चाहुलाही नसते....
कराव तरी काय हेच उमगत नाही.... !!!


कधी कधी वाटत झालेली गुंता कधीच नाही सुटू शकत... पण ही गुंता सोडवन्यासाठी फ़क्त एकच धागा महत्वाचा असतो आणि तो सापडनच खुप जास्त आवश्यक असत.... आणि तो सपडन्यासाठी च सगळ काही कराव लागत.... सापडला तर अगदी अलगद निघता येत नाहीतर गुंत्यातच गुंतून पड़ाव लागत....

आयुष्याच गमक कळत मग ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्यात च का अड़कुन पड़ाव ते कळत नाही.... 
हे सगळे मनाचे खेळ की मनुष्य जन्म असल्याचा अभिशाप ???

मैत्री




खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते,
तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.

असे असेल,तसे झाले असेल,असे काल्पनिक विचार करीत आपण

मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.

मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज,अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.


चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.पण मैत्रीमधील धागे तुटायला,एका क्षणाचाही वेळ लागत नाही.


तेव्हा मित्रांनो,

तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा 
आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राचीक्षमा मागायला लाजू नका............. !!!!!

ओळखलंत का सर मला !!!



ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून.................

माहरे वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली होते नाहोते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले......

कारभारणीला घऊेन संगे सर आता लढतो आहे,
चीखालगढ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे.......

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक लढ म्हणा...................... !!!

मराठी भाषा दिवस




मराठी भाषा दिवस - [Marathi Bhasha Diwas] जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवसमराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते

जीवनानंद


शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही...
कळत - नकळत जे काही रूजत गेलं...
त्याचचं फलीत ते, कुतुहलाने अंकुरत गेलं...
मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका...
मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण त्यांनाच...
त्यांनीच जानवु दिला नाही कधी ‘मी’ पणा...
म्हणूनच, पहील्या घंटेपासून - मध्यांतरा पर्यंन्त तरी...
शुन्य होतांनाही शुभाशुभ मुहुर्ते कधी मानलीच नाही...
आणि गोठलेल्या या पांढऱ्या गर्दितही...
निर्मळ - खळखळ वाहण्याचा पारदर्शक जीवनानंद घेता आला...
त्या माझ्या मातीतल्या हिरवळीचे ‌ऋण तिसऱ्या घंटेआधी फेडण्यासाठी...

प्रत्येक माणूस म्हणजे भावनांचा पेटारा



प्रत्येक माणूस म्हणजे भावनांचा पेटारा असतो... पण बंदिस्त.. अगदी कडी कुलुपात बंद.. बाहेरून  नुसतेच कडक कवच दिसते, परंतु आत मात्र खदखदणारे अद्भुत, अजब रसायन.....

गम्मत म्हणजे बहुतेकांना या कुलुपाची चावी कुठे शोधायची हेच ठाऊक नसते... मग नुसतेच कवच पकडून बसतात, आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावतात आणि मग अनर्थ होतात...मग दुसऱ्यांची किल्ली शोधायची तरी कुठे..?

पहिल्यांदा स्वत:ला स्वत:ची किल्ली शोधावी लागते. स्वत:ची किल्ली सापडली म्हणजे मग आधी स्वत:चे कवच भेदून आत शिरता येते आणि स्वत:ला समजून घेता येते. स्वत:ला समजून घेता आले, तरच इतरांना समजून घेणे सहजपणे जमते....

एकदा का ही समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली ना, की सगळे गुंते अलगद सुटतात, गैरसमज गळून पडतात...
इंद्रिये स्वछ्च आणि जास्त संवेदनशील होतात.. मग फुलाच्या गळून पडण्याचा नादही टिपता येतो आणि कोड्यात टाकणारी मौनेही बोलकी होतात.. असा माणूस पाण्यासारखा नितळ होऊन जातो.. दृष्टी आतून बाहेर निर्मळ होते.. मग जागा होतो खरा विश्वबंधुभाव.... तेव्हा स्वत:वर आणि इतरांवरही प्रेम करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत....

ते सहज साध्य होते.....!!!

कसं जमतं गं तुला?






कसं जमतं गं तुला?


एकांत क्षणी प्रेयसी होणं...

निवांत क्षणी सखी होणं...

अपयशाच्या क्षणी आई होणं...

अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं... 

किती बदलतेस भूमिका

किती वेळा, कशा?



कसं जमतं गं तुला?

भूक लागली असता भाकरी होणं,

स्पर्श हवा असता रेशीम होणं,

गंध हवा असता मोगरा होणं,

अन तहान लागली असता पाऊस होणं… 

कसं कळतं गं तुला?

मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?



आणि जमतं तरी कसं

असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं

किंवा पाऊस होऊन कोसळणं

मला जेंव्हा हवं तेंव्हा,

मला जसं हवं तसं…


मी मात्र गृहित धरतो

मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात

तू असशीलच हे

तुला ‘बायको’ नावाचं लेबल लावतो

आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'

हे मानतच जातो मनोमन.......



माझं हे मानणं, माझी ही गृहितं, माझ्या ह्या अपेक्षा...

ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...

अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी

कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला

तरी तो मला जाणवू न देता

हे सारं सारं जगणं......


Dedicated to all wonderful women !!!

प्रत्येकाचं च एक वेगळ विश्व असत



जेव्हा आपण मोठे होत असतो, तेव्हा स्वप्न बघायला, रंगवायला लागतो.... एक वेगळ विश्व तयार करत असतो......नवं-नवीन गोष्टी शिकत असतो.....अनुभवत असतो......

मी हि तेच केलंय....माझ्या विश्वात खूप थोडी लोक होती आणि आहेत.....मी खूप सरळ मानाने विचार करते......मला वाकड्यात शिरायला नाही आवडत... पण जशी जशी मोठी होत गेले अन महत्वाचं म्हणजे जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा जग कस आहे ते कळायला लागलं.....ज्या सोप्प्या पद्धतीने मी विचार करते तसं जग नाहीये.......हे लक्षात आलं.....

जसा जसा खोलवर विचार करायला लागले तसं तसं कळायला लागल कि माणूस नेहमीच एकटा असतो....कुठेही जाताना....काहीही करताना....काहीही असो......तो नेहमीच एकटा असतो कारण त्याच्या मनातले विचार फक्त त्यालाच माहिती असतात.......बाकी कुणालाच माहिती नसतात.......मोठं होत असताना, प्रत्येक जन घडत जात......
आप आपल्या पद्धतीने.... विचाराने...अनुभवाने.....

खूप काही करावस प्रत्येकाला च वाटत.....कारण प्रत्येकाचं च एक वेगळ विश्व असत....आपण तसं करत हि असतो.....कारण आपण च रंगवलेल जग आपल्याला अस्तित्वात आणायचं असत......हे सगळ करत असताना......एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते......ती म्हणजे आपला जोडीदार....... आई वडील भाऊ बहिण मित्र मैत्रिणी असतातच...... पण जोडीदार असण्याची गोष्ट च निराळी असते ... आणि पुन्हा या जोडीदार बद्दल प्रत्येकाने रंगवलेलं एक विश्व असत.....स्वप्न असतात......अपेक्षा असतात.....

आत्ता प्रश्न असतो २ लोकांचा.......ज्याच त्याच विश्व आणि स्वप्न.......  प्रत्येकाला च साजेसा,मनात रंगवलेला जोडीदार नाही मिळत........ मग इथे अस्तित्वात येते ती एकमेकांबद्दल ची आपुलकी,  जिव्हाळा, विश्वास आणि मैत्री..... या ४ गोष्टी जेव्हा त्या २ लोकां मध्ये बांधल्या जातात तेव्हा सगळ काही सुरळीत चालत....... अर्थातच सगळ हव तसच होत नसत....... पण जे काही होत असत ते समजूतदार पणे (mutual understanding) चालवाव लागत........ 

कारण आयुष्य असंच जागाव लागत..... जेव्हा त्या २ जणांत निस्वार्थी पणे एकमेकांसाठी जगण्याची भावना निर्माण होते, तेव्हा त्यांची बनवलेली विश्व रंगतात आणि ती अस्तित्वात येण्यासाठी ते २ घ हि एकमेकांना साथ देतात.... हि साथ असते आपुलकीची आणि त्यांच्यातल्या विश्वासाची....

भरपूर वेळा मन माराव लागत.. पण त्या हि मागे काहीतरी चांगल होणार असत म्हणूनच ते तसं असत ना..... नसतील तुमच्या २ घा त गोष्टी जुळत पण त्या समजूतदार पणे जुळूवुन घेण्यातच एक वेगळा आनंद असतो....... आणि त्यातूनच रंगलेलं आयुष्य अस्तित्वात येणार असत..... फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे जर कधी मना सारख होत नसेन तर मनाला समजावण्याची..... त्याला आधार देण्याची..... आणि जमल तर त्याला नियंत्रणात ठेवण्याची..... प्रत्येक वेळी नाही पण मात्र काही वेळा नक्कीच......

आयुष्याच खर गमक ज्याला उमगत त्याला आयुष्य भरभरून जगण अगदी सहज पणे जमत.....अन हे गमक उमजण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते....गरज असते ती फक्त विश्वासाची...स्वत: वरच्या आणि जोडीदारावरच्या ......!!!!

एकदा खऱ्या अर्थाने विश्वास ठेऊन बघा.....सगळंच सोप्प होईल.......

म्हणतात ना कि --
चालणारे दोन पाय किती विसंगत....
एक मागे असते, एक पुढे असते , 
पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याचा अपमान नसतो, 
कारण त्यांना माहित असत, क्षनात हे बदलणार असत,
याचच नाव जीवन असत....!!!!

नटसम्राट



                               प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, 
                               कधी योग्यता नसताना मिळतं तर कधी चूक नसताना निघून जातं .......

                              - नटसम्राट 

व. पु


जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं......
कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही