तू असशील तर




तू असशील तर ............
तू स्वप्नात येशील तर मला स्वप्न पाहायला आवडेल,
तू विचारांत असशील तर मला विचारांत हरवायला आवडेल,
मला स्वत: त च रमायला आवडेल, जर तुझ अस्तित्व माझ्यात असेन.....

तू हसवायला असशील तर मला हसायला आवडेल,
तू अश्रू पुसायला असशील तर मला रडायला आवडेल,
तुझी साथ असेन तर मला नक्कीच हे  जीवन जगायला आवडेल.... !!!