असं का होत ?



असं का होत ?

कुणाला काही सांगायचं असलं कि मन ओरडून ओरडून थकत,
पण शब्दांना मुकेच राहू देत....
कुणी आपल्या पासून दूर जात असतानाच - भावनांचा कहर होतो,
कितीही काहीही करावसं वाटलं तरी,
रस्ता फक्त अश्रुंसाठीच मोकळा होतो.....

जीवन



जीवन.............

जीवन म्हणजे नकळत होणारा प्रवास,
सुंदर स्वप्नांची कधीच न संपणारी एक वाट,
कधी चढ तर कधी उतार,
कधी काटेरी सहवास तर कधी फुलांचा सुवास,
तरीही हवा-हवासा वाटणारा हा मखमली भास....

हि वाट हि किती सुखद असते,
ज्यात पदोपदी आपल्यांची साथ असते,
कितीही दु:ख असले तरी भविष्यातील सुखांची चाहूल असते,
स्वप्नांच्या दुनियेत असलो तरी,
त्यांच्या पलीकडे जाऊन जगण्याची एक आस असते,
बुद्धीच्या जोरावर मनाच्या आकांक्षा पूर्णत्वास नेण्याची एक निस्वार्थी इच्छा असते....

कधी नात्यांची गुंफण तर कधी गुम्फ़नित्ल नात,
कधी मनातली भीती तर कधी भितीतल मन,
कधी विचारांची लहर तर कधी लहारीन्तले विचार,
संकटाना सामोरे जाताना स्वत:ला च शोधण्याचा लागलेला एक ध्यास....

चार क्षणाचं हे जीवन,
अगणित अनुभवांनी भरलेलं,
भावनांच्या खेळत गुंतलेलं,
कितीही जगावस वाटल तरी - नकळत एका क्षणात संपणार....